उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 नळदुर्ग येथील विवाहितेने पैशासाठी छळ केल्यामुळे पुलाखालील पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी घडली.
अंबिका युवराज मुळे (२५) यांनी माहेरहून पैसे आणावेत याकरीता पती युवराज संजु मुळे, सासरा संजू मुळे, सासू गुंडाप्पा मुळे, नणंद यल्लाम्म मुळे, दीर दिगंबर मुळे, जाऊ अंबिका मुळे, नागम्मा छनुरे, छकुली संकोळे (सर्व रा. इंदीरानगर, नळदुर्ग) यांनी मागील चार वर्षांपासून वेळोवेळी शारिरीक मानसिक त्रास दिला. तसेच माहेरहुन पैसे न आणल्याच्या कारणावरुन घराबाहेर हाकलून दिले. त्यांच्या या त्रासास कंटाळून नळदुर्ग जवळील अलीयाबाद पुलातील पाण्यात उडी मारुन अंबिका मुळे यांनी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 
Top