तुळजापूर / प्रतिनिधी
येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,हिंदुराष्ट्र सेना यांच्या वतीने शुक्रवार दि19रोजी  चिनी वस्तूंची होळी करण्यात आली.
छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक तुळजापूर येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,हिंदुराष्ट्र सेना यांच्या वतीने सकाळी 11.00 वाजता भारत-चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व त्या नंतर चिनी वस्तूंची होळी करण्यात आली.
यावेळी महंत मावजीनाथ महाराज, महंत व्यंकटअरण्य महाराज अँड जनक पाटील , अंड.गिरीश लोहरेकर,महेश गरड चेतन शिंदे,महेश गरड,संजय सोनवणे, रोहन भांजी,बालाजी जाधव,राजू भोरे,ओंकार पवार आदी उपस्थित होते

 
Top