तुळजापूर/ प्रतिनिधी-
तुळजापूर शहरातील महाद्वारनजीक असलेल्या मामाच्या मूर्तीच्या दुकानात भाच्चाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.१५) सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी लाॅकडाऊनमुळे गेल्या ३ महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने व्यावसायिकात अस्वस्थता पसरल्याचे बोलले जात आहे.
महाद्वारनजीक भवानी रोडवर कैलास बसप्पा मस्के यांचे देवीच्या मुर्तीचे दुकान आहे. या दुकानात मस्के यांचा भाच्चा संतोष कानडे (वय १८) याने रविवारी रात्री पत्र्याचा आडुला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी दुकान उघडण्यासाठी गडी आला असता गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. संतोष कानडे हा मामाचे दुकान पाहात असे. संतोष कानडेचे मूळ गाव परंडा आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलिस उपनिरीक्षक गणेश झिंजुरडे, रमाकांत शिंदे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
 
Top