लोहारा/प्रतिनिधी
 कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे राज्यात रक्त तुटवाढा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहानाला प्रतिसाद देत मुरुम येथील युवासेनेकडून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात सोशल डिस्टन्सिंग पाळून  ६१ जणांनी रक्तदान केले. राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रक्तपुरवठ्याची कमतरता भासत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसह जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नगरसेवक तथा युवासेनेच्या तालुका प्रमुख अजित चौधरी यांनी या संकटात युवासेनेकडून सामाजिक बांधीलकी जपत मुरुम येथील किसान चौक येथील भवानी मंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना नगरसेवक चौधरी यांच्यातर्फे एन ९५ मास्क व सेनिटायजर देण्यात आले.
 प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुरुम पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र  कारभारी, उपाध्यक्ष महेश निम्बरगे, रफीक पटेल, रवि अंबुसे, विलास वाडीकर आदींची उपस्थिती होती. शिबिरासाठी विशाल मोहिते, दादा टेकाळे, अनिकेत टेकाळे, विशाल टेकाळे, संजू आळंगे, जयसिंग खंडागळे, प्रवीण चौधरी, विशाल चौधरी, महादेव शिंदे, सागर खंडागळे, नाना हिंडोळे आदी, पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

 
Top