कळंब /प्रतिनिधी -
पर्याय संस्था, मुकुल माधव फॉउंडेशन, फिक्की फ्लो पुणे, फिनोलेक्स पाईप्स, साई मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने  एकल, विधवा, परितक्ता, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांना सोयाबीन, तूर बियाणे, सॅनिटायझर, व्हिट्यामिन सी गोळ्या, मास्क, टोपी, पिशवी आदी साहित्याचे घरपोच वाटप कळंब, वाशी, भूम, उस्मानाबाद तालुक्यातील 45 गावातील 409 महिलांना  करण्यात आले.
 पर्याय संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ अण्णा तोडकर, फिनोलेक्सचे प्रतिनिधी अमोल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज विकास संस्थेचे अध्यक्ष भूमिपुत्र वाघ, सौ. अनिताताई तोडकर, सुनंदा खराटे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले, चार तालुकयातील 45 गावामध्ये फिरून, लॉकडाऊन आणि कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करून हे वाटप करण्यात आले, कळंब येथील डॉ. वर्षा लक्ष्मीचंद कस्तूरकर यांनी सैनिटायझर आणि व्हिट्यामिन सि गोळया वाटपा करीता दिल्या होत्या.. हे सर्व साहित्य महिलांना घरपोच देण्यासाठी पर्याय चे समन्वयक सुनिल कांबळे, अशोक तोडकर, सुनंदा खराटे, मीराताई पवार, पत्रकार भिकाजी जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

 
Top