नळदुर्ग  / प्रतिनिधी
नळदुर्ग शहरात कोरोना विषाणूचा रुग्ण सापडल्याने शहरातील किल्ला गेट परिसरात अधिकाऱ्यांच्या गाडयांचा ताफा घुमू लागला आहे, दरम्यान आमदार राणा जगजितसिंह पाटील व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी शहरात भेट देवून पालिका तसेच आरोगय विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्याच बरोबर नागरीकांनी आपल्या घराबाहेर न पडता घरातच राहून आपल्या कुटूंबाची काळजी घेवून कोरोना विषाणूपासून बचाव करावा असे आवाहन ही आमदार पाटील यांनी यावेळी केले आहे. शिवाय आरोग्य विभागाकडे ज्या कांही सुविधा आहेत त्यासंदर्भात वैदयकिय अधिकारी डॉ. जानराव यांच्याशी चर्चा ही आमदार पाटील यांनी केली आहे. तर पालिका प्रशासन व तहसीलदार यांच्या आदेशानुसार नळदुर्ग शहरात चार दिवस जनता कफर्यू लागू करण्यात आला आहे.
नळदुर्ग शहरात रविवारी संध्याकाळी एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आला आसल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. किल्ला गेट परिसरात पालिका प्रशासनाने सर्वत्र परिसर सिलबंद केला आहे. दरम्यान या ठिकाणी सोमवारी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भेट देवून पालिकेचे मुख्याधिकारी व आरोग्य विभागाचे वैदयकिय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी यावेळी पालिका कर्मचाऱ्यांना दहा पी पी किटची भेट ही दिली असून जवळपास ५०० अर्सेनिक अल्बम ३० या होमीयोपॅथीच्या गोळया शहरवाशीयांना वाटण्यासाठी पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या. दि. ३१ मे रोजी शहरातील मुलतान गल्ली किल्ला गेट परिसरात एक व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. रात्रीचा हा परिसर पूर्णपणे सिलबंद करण्यात आला आहे. या परिसरात जाण्या येण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. तहसीलदार सौदागर तांदळे, मुख्याधिकारी हेमंत केरुळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे यांनी संपूर्ण रात्र जागरण करुन मुलतान गल्ली, किल्ला गेट परिसर सील करुन घेतले. त्याच बरोबर या कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या जवळच्या १५ नातेवाईकांना आरोग्य विभागाने रात्रीच ताब्यात घेवून त्यांना तुळजापूर येथे पाठविले आहे. या पंधरा जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्याचा अहवाल दि. २ जून रोजी संध्याकाळी येणार आहे.
नळदुर्ग शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील हे दि.१ जून रोजी तात्काळ नळदुर्ग शहरात दाखल होवून परिस्थीतीचा आढावा घेवून प्रशासनाला सुचना केल्या आहेत. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मीता कांबळे, नगरसेवक नय्यर जहागिरदार, तहसीलदार सौदागर तांदळे, मुख्याधिकारी हेमंत केरुळकर, वैदयकिय अधिकारी डॉ. जानराव, पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक श्री कुंभार, मंडळ अधिकारी श्री गांधले, तलाठी श्री कदम, भाजपाचे श्री सुशांत भूमकर, शहर भाजपाचे अध्यक्ष पदमाकर घोडके, श्रमीक पोतदार, सुनिल बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव आदी जण उपस्थीत होते.
यानंतर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याशी शहरवाशीयांची चर्चा झाल्यानंतर दि. १ जून ते दि. ४ जून असे चार दिदवस शहरात जनता कफर्यू लागू करावे असे ठरले. त्यानंतर शहरात चार दिवस जनता कफर्यू लागू करण्यात आली आहे. नगरसेवक नय्यर जहागिरदार, नितीन कासार, निरंजन राठोड, दयानंद बनसोडे, बसवराज धरणे, विनायक अहंकारी, सुशांत भूमकर, पदमाकर घोडके, श्रमीक पोतदार, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, लतीफ शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय विठठल जाधव, सागर हजारी, सुनिल बनसोडे यांनी शहरभर फिरुन बाजारपेठ तसेच भाजी मार्केट बंद केले. व्यापाऱ्यांनी ही त्यांना चांगला प्रतिसाद देवून आपली दुकाने बंद केली. यावेळी स्वत: तहसीलदार सौदागर तांदळे यांनी शहरात फिरुन नागरीकांनी जनता कफर्यूचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही यावेळी त्यांनी दिला आहे.
 
Top