तुळजापूर / प्रतिनिधी
कर्नाटक तेलगंणाचा धर्तीवर शेतकऱ्यांना रबी पेरणी साठी हेक्टरी पंचवीस हजार रुपयाची मदत करण्याची मागणी स्वाभीमानीशेतकरीसंघटनेने जिल्हाधिकारी यांना तहसिलदार मार्फत  निवेदन देवून केली आहे.
निवेदनात म्हटलं आहेकी कोरोना पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाँकडाऊन मुळे शेतकऱ्यांचा शेतमाल फळे भाजीपाला विकला न गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असुन शेतकऱ्यांन जवळ सध्या रबी पेरणीचाश बिबियाणे खते विकत घेण्यासाठी पैसे नाहीत तरी तेलगंणा कर्नाटकातील शेतकऱ्यांना तेथील शेतकऱ्यांना रबीपेरणी साठी अर्थिक मदत केल्याने शेतकऱ्यांना रबी पेरणीसाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये  अर्थिक मदत द्यावी म्हणजे तो आपल्या काळ्या आईची ओटी भरेल अर्थिक मदत न दिल्यास स्वाभीमानीशेतकरीसंघटना वतीने आंदोलन करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी  निवेदन देवुन दिला आहे.  यावेळी बापुसाहेब भोसले , सुनिल घाडगे  सह शेतकरी उपस्थितीत होते.
 
Top