उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हातील शाळा जुलैच्या नंतर परिस्थिती बघून चालू करण्याबाबत विचार करावा, तसेच प्राथमिकच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा ५० लाखाचा विमा राज्य सरकारने काढावा आदी मागण्याचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोवीड-१९ या विषाणू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असुन आत्तापर्यंत ७० रूग्णांच्या वरती कोराना पॉझेटिव संख्या झाली आहे. तसेच कोरानाचे आतापर्यंत ३ रूग्ण दगावले आहेत, अशा परिस्थितीत शाळा चालू करणे धोक्याचे होणार आहे. राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षण चालू करावे,तसेच प्राथमिकच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा ५० लाखाचा विमा राज्य सरकारने काढावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना  च्या वतीने प्रत्येक शाळेवर व प्रामुख्याने जिल्हा परिषदेवर तिव्र अंदोलन करण्यात येईल, अशा प्रकार इशारा  उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, विद्यार्थी सेनेचे सौरभ देशमुख, धिरज खोत उपस्थित होते. 
 
Top