नळदुर्ग / प्रतिनिधी
 शिवसेनेच्या वतीने  नळदुर्ग उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील पडलेला भला मोठा खड्डा बुजविण्यात आला, सत्ता असो वा नसो शिवसैनिक नेहमीच कार्य करण्यास तत्पर असतात. गेल्या कित्येक दिवसापासून या राष्ट्रीय महामार्गावर भला मोठा खड्डा पडला होता, पण याकडे कोणत्याही प्रशासनाने लक्ष्य दिले नव्हते, अशातच ही बाब जेंव्हा शहरप्रमुख संतोष पुदाले यांना समजली तेंव्हा त्यांनी उपजिल्हाप्रमुख कमलाकर काका चव्हाण, तथा उपतालुकाप्रमुख सरदार सिंग  ठाकूर, उप शहर प्रमुख शाम कणकधार, सुनिल गव्हाणे, ग्राहक संरक्षण कक्षाचे नेताजी महाबोले, भीमा कोळी आदींच्या उपस्थितीत हा खड्डा बुजविला त्यामुळे येणाऱ्या काळात या खड्यामुळे होणारे अपघात तूर्तास तरी होणार नाहीत. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधीत विभागाने या बाबीकडे लक्ष घालून राष्ट्रीय महामार्गावरील खडडे बुजवून खाडडयाच्या माध्यमातून होणारे आपघात टाळावे अशी मागणी प्रवाशातून केली जात आहे. कारण शिवसेने कडून बुजविण्यात आलेल्या खाडडयात आपघात होऊन अनेकांचे प्राण गमवावे लागले होते त्यामुळे संबंधीत विभागाने याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

 
Top