उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरातील बोंबले हनुमान रोड (उंबरे कोठा) या भागातील एक गर्भवती महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून या महिलेवर लातूर येथे उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
जिल्हयातील रुग्णाची संख्या 139 झाली असून 90 जण बरे झाले आहेत तर 46 जणांवर उपचार सुरू आहेत. 8 महिन्याची ही गरोदर महिला शहरात अनेक ठिकाणी गेली आहे . गरोदर महिला ही उस्मानाबाद शहरातील  ३ रुग्णालयात उपचारासाठी गेली होती त्यामुळे डॉक्टर डंबळ, डॉ.स्वामी या हॉस्पीटल मधील संबंधीत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर सहयाद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
या संदर्भात सहयाद्री हॉस्पीटलचे डॉ. दिग्गज दापके यांना माहिती विचारली असता संबंधीत रूग्णांवर एक दिवस हॉस्पीटलमध्ये उपचार केल्यामुळे पुर्ण हॉस्पीटलचे र्निजंतुकीकरण करने आवश्यक असते, याबाबत महसूल व पोलिस पथकाने पहाणी केली आहे. हॉस्पीटल मधील चार ते पाच गंभीरस्वरूपातील रूग्णांना अन्य स्थळी हलवून र्निजतुकीकरण करावे लागेल, असे डॉ.दापके यांनी सांगितले. 
 
Top