नळदुर्ग/ प्रतिनिधी-
नळदुर्ग शहरात आज दि. २१ जून रोजी आणखीन दोन कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण वाढले आसल्याने शहरात आता एकूण कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ही १३ झाली आहे, दरम्यान शहरात वाढणारी कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या पाहता शहरात चिंतेचा विषय बनला आहे. आज वाढलेले दोन्ही कोरोना विषाणू बाधीत हे पूर्वीच्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत चालली आहे त्यामुळे शहरात आता कोणत्याही परिस्थीतीत जनता कफर्यूची लागू करावेच लागणार आहे पंरतु यासाठी पालिका प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्या विभागाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. सध्या शहरात या तिघांकडून ही कोणतीच उपाय योजना राबविण्यासाठी प्रयत्न केला जात नाही. त्यामुळे भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दि. १५ जून रोजी शहरातील पाचव्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची माहीती मिळाली. आणि त्यानंतर शहरात गेल्या पाच दिवसात या एका रुग्णापासून सात रुग्णांची संख्या वाढली आहे त्यामुळे आता शहरातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ही तेरा झाली आहे. आता शहरातील कोरोना पॉझीटीव्हची रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आसल्याने शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आता प्रशासनाने या बाबीकडे जातीने लक्ष देवून शहरातील ज्या भागात कोरोना रुगणांचे रुगण सापडले आहेत त्या भागात सील करुन चालणार नाही तर आता संपूर्ण शहरातच जनता कफर्यू लागू करुन या वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या बाधीतांच्या संख्येत घट होणार आहे त्यामुळे आता पालिका प्रशासनाने या बाबत तात्काळ विचार करुन सोमवार पासूनच जनता कफर्यू लागू करणे गरजेचे आहे.
 
Top