वाशी/ प्रतिनिधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील रहिवासी असलेले अरुण विलासराव उंडे यांचा एम.पी.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण होवून उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.अरुण उंडे यांचे 5 वी ते 10 पर्यंतचे शालेय शिक्षण तुळजापूर येथील श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थान संचलित, श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात झाले. अरूण उंडे हे शासकीय सेवेत जाण्याच्या हेतूने सहा वर्षांपासून अभ्यास करीत होते. वडील  विलास मनोहर उंडे माजी सैनिक व शेतकरी असून आई गृहिणी आहे. आई व वडिलांनी कठोर मेहनत करून आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले . आई व वडिलांची  मेहनीतीची , कष्टाची अरूण उंडे यांनी चिज  करुन यशाचे शिखर गाठले 
शासकीय सेवेत जाण्याच्या जिद्दीने सहा वर्ष पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी जिद्दीने अभ्यास केले.   नौकरी करीत सातत्यपूर्ण कष्ट, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर त्याने यश अक्षरशः खेचून आणले.  सध्या ते एमपीएससी परीक्षेतून राज्य उत्पादन शुल्क विभागात सहाय्यक आयुक्त अधिकारी म्हणून पदावर कार्यरत आहेत.  पदावर कार्यरत असताना त्यांचा  अभ्यास चालुच होता,दि. 19 जून रोजी परत उपजिल्हाधिकारी म्हणून अरुण उंडे यांची निवड झाली.
उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल  वाशी ता. वाशी येथील इंजिनीअर नंदकुमार कवडे,अभय कवडे, शोएब काझी ,सौदगार डोरले,उदय चेडे,राजेश उंदरे ,योगेश विश्वेकर ,दिनेश वीर यांच्यावतीने   अरूण उंडे यांचा सत्कार करण्यात आला. 
 
Top