उस्मानाबाद /प्रतिनिधी
कावळेवाडी, गोवर्धनवाडी येथील शेतकऱ्यांना  सोयाबीन बियाणे वाटप प्रक्रियेतून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, मागणी मान्य झाली तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  कावळेवाडी, गोवर्धनवाडी शिवारातील शेतकरी यांनी मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचेकडून सिड चे बियाणे घेवून त्याची लागवड केलेली होती. परंतु यावर्षी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचे ढोकी येथील बिज प्रक्रिया केंद्रातील कार्यालयाने शेतकऱ्याची जे.एस.335 वाणाचे सोयाबीन बियाणे मिळावे म्हणून मागणी अर्ज केलेले होते. सदर अर्ज करतेवेळी ढोकी, बुकणवाडी, गोरेवाडी व इतर गावातील शेतकऱ्यांनी मागणी अर्ज या गावातील शेतकऱ्यांनी दिलेल्या अर्जासोबत दिलेले होते. असे असताना देखील जिल्हा व्यवस्थापक म.रा.बि.म.उस्मानाबाद यांनी कावळेवाडी गोवर्धनवाडी हे छोटी गावे आहेत म्हणन तेथील शेतकऱ्यांवरती अन्यायकारक नियम लावून मागणी अर्ज घेतलेले असताना देखील त्यांची नावे बियाणे वाटपाच्या यादीमध्ये घेतलेली नाहीत. याउलट दोकी तेरं या मोठया गावातील संपुर्ण शेतकऱ्यांना सरसगटपणे बियाणे वाटपासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कावळेवाडी व गोवर्धनवाडी शिवारातील पोलीस त्यांची आर्थीक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून पारंपारीकपणे बियाणे मडळाकडन बियाणे घेत असताना देखील महामंडळाने घेतलेला अन्यायकारक निर्णयामुळे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.  महामडळान येत्या पाच दिवसांच्या आतमध्ये या शेतकऱ्यांना सोयाबीनचे जे.एस.335 वाणाचे बियाणे या पारा आपण द्यावत, अन्यथा आम आदमी पार्टी महारष्ट्र  राज्य बियाणे महामंडळाच्या  विरोधात  आंदोलन छेडेल. अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 
Top