नळदुर्ग/प्रतिनिधी
सन २०१८--१९ यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबद्दल राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी मंजुर केलेले आठ हजार रुपयांचे अनुदान आपल्याला अद्याप मिळाले नसुन या प्रकरणाची चौकशी करून यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून मला तात्काळ अनुदानाची रक्कम मिळवुन द्यावी अशी मागणी धनगरवाडी येथील शेतकरी दत्तात्रय तानाजीराव भाळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१८--१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठयप्रमानात नुकसान झाले होते. त्यासाठी राज्यपालांनी पिकांचे नुकसान झाले म्हणुन शेतकऱ्यांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये इतके अनुदान मंजुर केले होते. मात्र हे अनुदान आपल्याला अद्याप मिळाले नाही. वास्तविकपाहता अनेक शेतकऱ्यांना हे अनुदान तेंव्हाच मिळाले आहे मात्र मी वारंवार प्रयत्न करूनही मला हे अनुदान मिळाले नाही. धनगरवाडी येथे गट नं.१०९/१ मध्ये माझी ४७ आर इतकी जमीन आहे. त्या क्षेत्राचे जवळपास पाच ते सहा वेळेस बँक पासबुक, आधारकार्डचे झेरॉक्स सज्जा अणदुरचे तलाठी यांच्याकडे दिले आहे. मात्र हे तलाठी महाशय माझे मंजुर झालेले अनुदान देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहेत. त्याचबरोबर सन २०१७-१८ मध्ये शासनाने मंजुर केलेले दुष्काळी अनुदानही आपल्याला आजपर्यंत मिळाले नाही. याची चौकशी करून मला तात्काळ अनुदान उपलब्ध करून द्यावे. नळदुर्ग येथे कांही महिन्यांपूर्वी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात मी तहसिलदार यांची भेट घेऊन त्यांना ही बाब सांगितली त्यावेळी तहसिलदारांनी तलाठ्यांना ताबडतोब अनुदान देण्याची सुचना केली होती. मात्र अनेक महीने उलटुन गेले तरी मला अनुदान मिळाले नाही. या प्रकरणाची चौकशी करून यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून मला अनुदान मिळवुन द्यावे अशी मागणीही या निवेदनात दत्तात्रय भाळे यांनी केली आहे.
 
Top