परंडा / प्रतिनिधी-
परंडा येथील पोलीस कॉलनी मध्ये दोन जणांचा वैद्यकीय अहवाल पॉझीटीव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून नगरपरिषदेने आज परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे.दक्षता म्हणून शहरात दोन दिवस जनता कर्फ्युव घोषीत करून अत्यावश्यक सेवा सोडून संपूर्ण व्यवहार दोन दिवस बंद पाळण्याची ध्वनीपेक्षा वरून नागरिकांना कळविण्यात आले आहे.
शहरात कोरोना पॉझीटीव्ह दोन रुग्ण प्रथमच आढळल्याने पोलीस कॉलनी मध्ये सर्वजनिक अरोग्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांचे हित व सुरक्षतेच्या दृष्टीने कॉलनीचा संपूर्ण परिसर आज सकाळी शनिवार रोजी पालीका प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.    या परिसरातील नागरीकांनी प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व परिसराच्या बाहेरच्या व्यक्तीना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.तेसेच आज पालिकेच्या वतीने सकाळी पोलीस कॉलनी परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.आरोग्य विभागाकडून पोलीस कॉलनीतील राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
प्राप्त कोरोना पॉझीटीव्ह दोन रुग्नांना उपचारासाठी कळंब कोवीड सेंटर येथे पाठविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या तीन जणांचे स्वॅब येथील उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने  तपासण्यासाठी पाठविले आहे. त्यांचे रिपोर्ट आज रात्री येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

 
Top