उस्मानाबाद/ प्रतिनिधी
तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) गावाची आदर्श गावाकडे घौडदौड सुरू आहे. ग्रामस्थांना अल्प दरात शुद्ध पाणीपुरवठा घरपोच करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने आरओ प्लॅन्टची उभारणी करण्यात आली आहे. तसेच सुरक्षतेसाठी गावातील मुख्य चौकात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आरओ प्लॅन्टसह सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२६) लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती संजय लोखंडे, सरपंच प्रशांत रणदिवे, राजाभाऊ पाटील, ललत लिंगे, ज्येष्ठ नेते पांडूरंग कठारे, रावसाहेब मसे, रमेश रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर देवगिरे, अशोक परीट, पंडीत देवकर, माजी जिप सदस्य शामसुंदर परीट, अमर बाकले, सुरेश शिंदे, जोतिराम रणदिवे, श्रीकांत कोल्हे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, राजाभाऊ महाराज देवगिरे, माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू शिंदे, जडावसिंग रजपुत, ग्रामपंचायत कर्मचारी पांडूरंग रणदिवे, शैलेश शिंदे, अंगद देवगिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला.
 
Top