तुळजापूर / प्रतिनिधी-
 कोरोना पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीर भविकांना प्रवेश बंद असतानाही नवदांम्पत्य येथे येवुन महाध्दार मधुन कळस दर्शन घेवुन वावरयाञा पुर्ण करीत असल्याने मंदीर  महाध्दार समोर ब-याच महिन्या नंतर नवदांम्पत्य बरोबरच भाविकांची गर्दी दिसुन येत आहे.
शुक्रवारी दिवसभर सुमारे शंभर नवदांम्पत्यांनी येथे गर्दी केली होती. भाविकांचा वावर वाढल्याचा पार्श्वभूमीवर महाध्दार परिसरातील व्यापारी वर्गाने आपले दुकाने उघडून व्यवसाय सुरु केला आहे.
व्यवसाय जरी अपेक्षित होत नसला तरी काही प्रमाणात धंदा होवु लागल्यामुळे लवकरच सर्वकाही सुरुळीत होईल असा आशावाद व्यक्त करीत आहे
सध्या मोठ्या संखेने होत असलेल्या लग्न सोहळ्याचा पार्श्वभूमीवर नवविवाहीत नवदांम्पत्य खाजगी वाहनांनी  तिर्थक्षेञ तुळजापूर ला येवुन राजमाता जिजाऊ महाध्दार समोरून जोडीने कळस दर्शन घेवुन  आपली वावरयाञा देवी चरणी पुर्ण केल्याचे समाधान मानून गावी जावुन आपल्या नव्या संसारास आरंभ करीत आहे.शासनाने सांगितले आहे की आता कोरोना बरोबर चालावे लागेल या आदैशाचे पालन करीत  तोंडाला मास्क व गाडीत सोशल डिस्टंन्स पाळुन नवदांम्पत्य  वावर याञा पुर्ण करीत आहेत
कोरोना पार्श्वभूमीवर रखडलेले विवाह सोहळे सध्या साधा पध्दतीने मोठ्या संखेने होत असुन या पार्श्वभूमीवर नवविवाहीत नवदांम्पत्यांची गर्दी होत आहे. शहरवासिय लवकर पुनश्च भाविकांचा वावर मोठ्या संखेने सुरु होवुन पुर्वी सारखे तिर्थक्षेञ तुळजापूर भाविकांनी गजबजून जाईल असा आशावाद व्यक्त करीत आहे.

 
Top