लोहारा/प्रतिनीधी
 लोहारा येथील हायस्कूल लोहारा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याने एकत्र येऊन स्थापना केलेल्या विद्या विकास प्रतिष्ठानाच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजार रूपयाचा धनादेश लातूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आला. 
लोहारा येथील हायस्कूल लोहारा या शाळेचे ठिक- ठिकाणी उद्योग, व्यवसाय तसेच विविध पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थानी महाराष्ट्र राज्याचे निवृत्त मुख्य अभियंता गुंडप्पा लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत विद्या विकास प्रतिष्ठान या बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या प्रत्येक संचालकाने दरवर्षी एक लाख रुपयाचा निधी प्रतिष्ठानच्या खात्याात जमा करायचे ठरले आहे. पाच वर्षात जमा होणारी एकूण ५५ लाख रुपयेची निधी बँकेत ठेवून यातून येणारा व्यााजात दरवर्षी या प्रतिष्ठानकडून लोहारा तालुक्यातील गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरज भागविण्याचा येणार आहे. परंतु यावर्षी करोनाच्या साथीमुळे संस्थेला कोणताही जाहीर कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यासाठी निश्चित केलेला निधी विद्या विकास प्रतिष्ठानाच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक्कावन हजार रूपयाचा धनादेश लातूर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डाॅ अनंतराव गव्हाणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव तुकाराम गोरे, कोषाध्यक्ष नागनाथ केसकर, उपाध्यक्षा सौ. सुलन देवकर-खांडेकर, संचालक भारत काळे, चंद्रकांत विभुते, वसंत ठेले आदींची उपस्थित होते.
तसेच बी. पी. माळी, निवृत्त शिक्षण अधिकारी, रा. जेवळी - गेल्यावर्षी विद्या विकास प्रतिष्ठानाच्या वतीने लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या दुर्भावामुळे कार्यक्रमास मर्यादा आल्या असून शासनापुढेही आर्थिक अडचण निर्माण झाल्या आहेत. यासाठी प्रतिष्ठानाच्या संचालकाकडून सारासार विचार होत जमा झालेली ५१ हजार रुपये आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत आहोत.
 
Top