उस्मानाबाद /प्रतिनिधी
 तुळजापूर तालुक्यातील खडकी तांडा येथे दि. 11 जून 2020 रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टीमने दोन अल्पवयीन मुलींचे
बालविवाह थाबविण्यात यश संपादन केले.
 यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.निपानीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.हावळे यांच्या सुचनेनुसार समुपदेशक श्रीमती कोमल धनवडे, सामाजिक कार्यकर्ता योगेश शेगर, क्षेञीय कार्यकर्ता श्रीमती जयश्री पाटील (तिर्थकर) व श्री.हर्षवर्धन सेलमोहकर, तामलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक जमदाडे व इतर पोलीस मीञ  तसेच खडकी तांडा येथील ग्रामसेवक श्री. दुधभाते, सरपंच व इतर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये घटनास्थळी जावून सदर घटनेची शहानिशा करुन दोन्ही अल्पवयीन मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले.   मुलीचे 18 वर्ष व मुलाचे 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे हमीपञ गावकऱ्यांच्या साक्षीने लिहून घेवून बाल विवाह रोखण्यात आला.
 
Top