उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोनाने आपल्या शहरासह संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढविला आहे. नगरपालिका प्रशासन, पालिकेतील सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून शहरात कोरोणाचा संसर्ग रोखण्यात आपल्याला बऱ्यापैकी यश मिळाले आहे.
शहरातील पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांचीही चांगली मदत मिळाली आहे. ज्या भागांमध्ये कोरोनाची संख्या वाढली, त्या भागांमध्ये मी स्वतः तसेच आमच्या पालिकेचे कर्मचारीवर्ग यांनी तेथे जाऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. रातोरात, पहाटे कंटेनमेंट झोन निर्जंतुकीकरण करून घेतला आहे. त्याला पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाचीही चांगली साथ मिळाली आहे. विशेष करून आपण सर्व पत्रकार बांधवांनी आम्हा पालिकेच्या प्रशासनाला, आरोग्य विभागाला सातत्याने सहकार्य करत आला आहात. शहरात covid-19 चे वार्तांकन करीत असताना आपल्यालाही मोठी जोखीम पत्करावी लागत आहे. शिवाय कोरोना संसर्गाला नियंत्रणामध्ये ठेवण्यात आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे मोठे योगदान आहे. तुम्ही सर्वांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शहरातील विविध भागात जाऊन कोरोना योद्धा म्हणून आपण काम करीत आहात. शासकीय सेवेत असलेल्या सर्वांना शासनाकडून विम्याचे कवच मिळते. मात्र कोरोनाच्या काळातील आपले काम ही तेवढ्याच तोलामोलाची आहे. केवळ आपण शासकीय सेवेत नसल्याने संरक्षण मिळत नाही. नगराध्यक्ष या नात्याने तुम्ही केलेल्या कामगिरीचे मला निश्चितच कौतुक आहे. तुमच्या या कामगिरीची दखल घेऊन मी वैयक्तिक रित्या तुम्हास विम्याचे कवच देण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा विमा काढत आहे. आपण सर्वांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून योग्य ती कागदपत्र त्यांच्याकडे द्यावीत. त्यामुळे शहरातील पत्रकार बांधवांचा विमा काढण्यास सोपे होईल.
त्यासाठी आपण आपले आधार कार्ड, काम करीत असलेल्या दैनिकाचे ओळखपत्र, जन्मतारखेचा पुरावा : ड्रायव्हिंग लायसन/ दहावीची सनद/ पॅन कार्ड या पैकी एक, फिटनेस प्रमाणपत्र. वरील कागदपत्रांची पडताळणी करून आपला 5 ते 10 लक्ष रुपयांचा विमा काढण्याचा माझा वैयक्तिक प्रयत्न आहे. आपण आपली कागतपत्र देऊन सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले आहे.