उस्मानाबाद /प्रतिनिधी
दि..13.06.2020 आढावा बैठक घेतली असता. उस्मानाबाद   जिल्हयासाठी सोयाबीन मात्रा 188.00 क्विंटल स्त्रोत बियाणे कमी उपलब्ध झाले आहे असे निदर्शनास आले. जिल्हा व्यवस्थापक महाबीज उस्मानाबाद यांना बियाणे मागणी करण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने संदर्भीय दि..13.06.2020 च्या पत्रान्वये जिल्हा व्यवस्थापक महाबीज उस्मानाबाद यांनी आपणास बियाणे उपलब्ध करण्याबाबत मागणी केली आहे. प्रत्येक हंगामात बिजोत्पादन कार्यक्रम राबवित असलेल्या गावांनासुध्दा बिजोत्पादन कार्यक्रम आवंटीत करता आलेला नाही. परंतु त्यामध्ये बिजोत्पादन कार्यक्रमापासून वंचीत राहिलेल्या गावांना सुध्दा स्त्रोत बियाणेचे वाटप होण्याबाबतची मागणी होत आहे.
तरी बिजोत्पादन कार्यक्रमाकरीता कमी पडत असलेल्या स्त्रोत बियाणेंची सोयाबीनच्या कोणत्याही वाणाची मात्रा उस्मानाबाद जिल्हयाकरिता तात्काळ उपलब्ध करून पाठविण्याबाबत खा. ओमराजे निंबाळकर यांची मा. महाव्यवस्थापक,  (उत्पादन) महाबीज अकोला यांच्या कडे पत्राद्व्यारे मागणी. 
 
Top