तुळजापूर /प्रतिनिधी
 तालुक्यात मान्सुन पुर्व व मृग नक्षत्राचा पेरणी पुरता पाऊस झाल्याने तालुक्यातील काही भागात खरीप पेरण्या बळीराजाने सुरु करण्यास आरंभ करताच  नामांकित कंपनीचे बि -बियाणे खते तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी नाईलाजास्तव  दुकानदार देईल ते बि-बियाणे व खते  घेवुन काळ्या आईची ओटी भरत पेरणी सुरु केली आहे.
तुळजापूर तालुक्यात सरासरी खरीप पेरणी क्षेत्र 79300 हेक्टर असुन यंदा सर्वाधिक पेरणी सोयाबीनची केली जात आहे, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अपेक्षित असे बियाणे व खत मिळत नसल्याने शेतकरी वर्ग मिळेल ते बियाणे व खत पेरणी करीत आहे, शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी ही महाबीज चे सोयाबीन व उंची असणारे सोयबीनच्या 162 या वाणाला व डीएपी खत या वाणाला मागणी आहे.
परंतु याची  प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. कोरोना संसर्गजन्य साथ रोग काळात शाषणांचा सरकारी खाजगी कार्यालयांन सह व्यापार कारखाने बंद होवुन तेथे काम करणाऱ्यांचा हाताला काम नव्हते  सर्व काही थांबले असताना फक्त बळीराजा माञ आपल्या शेतात काम करुन  शेतमजुरांना शेतात काम देवुन त्याचा हाताला काम देत होता. कोरोना काळात सर्वांना शाषाणाने भरभरून मदत केली परंतु बळीराजाला  माञ कुठलीही मदत केली नाही, तरीही न डगमगता जीव धोक्यात घालुन खरीप पेरणी मशागत केली आता काळ्या आईची ओटी भरावी म्हटलं बिबियाणे खते टंचाई समोर आले. शेतकरी कोरोना काळात कामा  करीत असताना शासनाने  त्याला पेरणी साठी बि-बियाणेखते उपलब्ध करुन देणे गरजेचे असताना ते शासन उपलब्ध करु शकले नाही त्याचा परिणाम शेतकऱ्यांना आपल्या अपेक्षित बियाणे ऐवजी मिळेल ते बि-बियाणे, खते घेवुन पेरणी करण्याची वेळ आली आहे.
कोरोना मुळे शेतमालाला भाव न मिळाल्याने आधीच अर्थिक संकटात असलेल्या बळीराजाला बि-बियाणेखते टंचाई ला सामोरे जावे लागत आहे.

 
Top