उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील ग्रिनलॅन्ड इंग्लिश स्कूल मध्ये राजरोस पणे पुस्तके वह्या गणवेश सक्ती करून चढ्या दराने विक्री करून पालकांची लुट करत आहेत,तसेच मागील वर्षाच्या फिस साठी शाळा पालकांना पैशांची मागणी करत आहेत. त्यामुळे या शाळांची सखोल चौकशी करावी अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी शिक्षण अधिकारी (प्रा)व माध्यमिक यांच्याकडे निवेदना द्वारे करून संबंधित शाळांची चौकशी करून शाळेवर कडक कारवाई करण्यात यावी मागणी केली आहे .
निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने लाॅकडाऊन च्या काळात पालकां च्या  हाताला कामे नव्हती मजूरी नव्हती त्यामुळे शासनाने सर्व शाळाना मागील वर्षांच्या फिस साठी पालकांना मुदतवाढ दिली आहे तरी पण सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालकांना फिस साठी सतत तगादा लावला जात आहे ,आणी सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शालेय साहित्य विक्री चढ्या दराने करत आहेत याविषयी मागील दोन वर्षांपासून मनसे सतत निवेदन देत आहे परंतु शिक्षण विभाग या शाळांना हेतू परस्पर पाठीशी घालत आहे, या शाळांचं सखोल चौकशी करावी अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी शिक्षण अधिकारी (प्रा)व माध्यमिक यांना निवेदना द्वारे संबंधित शाळांची चौकशी करून शाळेवर कडक कारवाई करण्यात यावी मागणी केली आहे .
 
Top