परंडा/ प्रतिनिधीआज दि.२१ रविवार रोजी येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय औरंगाबाद ,श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय फूलंब्री,संत रामदास महाविद्यालय घनसावंगी आणि बी.एस.पटेल महाविद्यालय पिंपळगाव काळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २१ रविवार रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त एक दिवशीय प्रात्यक्षिक व कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.विजय भोसले सर यांच्या हस्ते करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा.सावळे,डॉ.सुभाष टकले, औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी प्रा.गोकुळ तांदळे, प्राचार्य डॉ.आय.ए.राजा पिंपळगाव काळे, डॉ.बाबासाहेब मस्के, जिल्हा योगा संघटनेचे श्री सुरेश मिरकर,योगाचार्य प्रा.डॉ.बाबाराव सांगळे आदींची उपस्थिती होती. या कार्यशाळेमध्ये एकूण ८३२ प्राध्यापक, शिक्षक ,योग प्रेमी विविध महाविद्यालयाचे खेळाडू यांनी सहभाग नोंदवला होता.सदर कार्यशाळेचे आयोजन प्रा.डॉ.कृष्णा परभणे,डॉ.नितीन मालेगावकर ,डॉ.रोहिदास गाडेकर आदींनी केले होते.या कार्यशाळेमध्ये उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.भोसले म्हणाले की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये योगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे, त्यामुळे प्रत्येकांनी दररोज योगा करणे गरजेचे आहे. प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी सांगितले की योगा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.योगामुळे आपले मन,शरीर तंदुरुस्त राहते आणि आपले आयुर्मान वाढले जाते. योगा हा केवळ २१ जून रोजी न करता वर्षभर योगा केल्याने आपले शरीर आपले मन तंदुरुस्त राहून आपल्यापासून अनेक रोग दूर राहतात.प्रतिकार शक्ती टिकून राहते.जिल्हा क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे यांनी ही योगा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.योगाचार्य प्रा.डॉ.बाबाराव सांगळे बुलढाणा यांनी योगाचे विविध प्रात्यक्षिक करून दाखविले आणि योगाचे जीवनात महत्व काय आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.सर्व उपस्थित सहभागी प्राध्यापक शिक्षक क्रीडाशिक्षक सर्वांनी या कार्यशाळेचा आस्वाद घेतला.सुत्रसंचालन डॉ.संदीप जगताप यांनी केले, प्रस्ताविक डॉ.पांडुरंग कल्याणकर यांनी केले तर आभार शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ.विजय डोंगरे यांनी मानले.