
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांचा शुक्रवार (ता.१९) रोजी जिल्हयात विविध कार्यक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा बसवराज पाटील यांच्या कडुन जिल्ह्यात 12000 जेवनाचे पॉकीट वाटप करण्यात आले
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या सौजन्याने एक हजार गरजूंना एक वेळच्या जेवणाचे पॅकेट, रुग्णालयातील डाॅक्टरर्स, कर्मचाऱ्यांना पीपीई कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी कळंब तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पांडूरंग तात्या कुंभार, भागवतराव धस, रवींद्र भाऊ ओझा, भैय्याजी निरफळ, प्रणित डिकले, अॅड.भारत लोमटे, ज्योतीताई सपाटे, आप्पासाहेब शेळके, मुजम्मिल पटेल, पोपटराव अंबिरकर, रोहीत कसबे, बिट्टु पाटील, पप्पू गायकवाड, सचिन गायकवाड, शाहजान शिकलकर, रुक्सानाआप्पा बागवान, बबन होसलमल, इंदूताई तनपुरे, पुष्पाताई आगलावे, कदमताई आदींच्या उपस्थितीत वाटप केले.
वाशी : खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी येथे ग्रामीण रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, साठे नगर, पारा चौक येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या वतीने एक हजार गरजूंना जेवणाचे पॅकेट वाटप केले. यावेळी कार्यकर्त्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अवधूत क्षिरसागर, माजी जिल्हा सरचिटणीस युवक काँग्रेसचे ब्रह्मानंद पतील, महिला जिल्हासरचटणीस स्नेहल स्वामी, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमर तागडे, बाळासाहेब पोरे, बळवंतराव कवाडे, मारुती क्षिरसागर, राजेश शिंदे, अमोल बोडके, शिवाजीराव गायकवाड, उद्धव तात्या कवडे, अशोक कवडे, अमोल क्षिरसागर, विजय गायकवाड, बब्रुवान गायकवाड, जगदिश पाटील, व्यंकट बलसुरे आदींनी पुढाकार घेऊन वाढदिवसाचा कार्यक्रम यशस्वी केला.
परंडा : खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्याकडून एक हजार जेवणाच्या पॅकेटचे वाटप अॅड.दादासाहेब खरसडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष,अॅड.नुरोद्दीन चौधरी, अॅड.श्रीकांत भालेराव, रमेशसिह परदेशी, अॅड.हनुमंत वाघमोडे, अॅड. धनंजय झाडबुके, नितीन गाढवे, शशिकांत खैरे, महावीर ईतापे, भगवान खैरे, शेरखाॅ साहेब, जयसिंग बिडवे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.