तुळजापूर / प्रतिनिधी-
 येथिल शिवगणेश सांस्कृतिक मंडळ व शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच कोरोना संकटकाळात रक्त तुटवडामुळे दिपक चौक येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आलेले होत.
 या शिबीरामध्ये 101 तरूणांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.  तर शिवगणेश मंडळाच्या वतिने रक्तदात्यांना सॅनिटायझर, हँडवाॅश, साबण, मास्क असलेली कोरोना संरक्षण किट भेट देण्यात आली. सोशल डिस्टंसींग चे पालन करत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शिवमुद्रा परीवारचे नितीन पवार, किशोर पवार, प्रशांत पवार, अजिंक्य दांडे, रितेश लोखंडे, दयानंद रेणके, जगदिश पाटील, प्रविन भिसे, सुरज कदम, अन्वर बागवान, अक्षय साळुंके, हरी सुरवसे आदीनी परीश्रम घेतले..

 
Top