उस्मानाबाद /प्रतिनिधी-
  बुधवारी उस्मानाबाद जिल्हयात नवीन ६ रूग्ण कोरोना पॉजिटीव्ह आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९४ झाली असून ४१ जणाना उपचारानंतर घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५० रुग्णावर उपचार सुरु आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक 3 जून 2020 रोजी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकूण 70 स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सात व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह, दोन प्रलंबित व दोन व्यक्तींचा अहवाल
अनिर्णित आहे. व सात पॉझिटिव पैकी एक व्यक्ती उस्मानाबाद शहरातील पूर्वीचाच रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यात आज नवीन सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडलेली आहे, अशी माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
   पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती
एक रुग्ण केसरजवळगा येथील असून, पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. दुसरे दोन पेशन्ट अंदोरा ता. कळंब येथील असून ते 29 मे रोजी मुंबई रिटर्न आहेत. एक पेशंट धुता येथील असून पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. एक पेशंट सुंभा येथील असून पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. एक पेशंट कारी येथील असून पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहे. असे एकूण नवीन सहा रुग्ण व एक जुनाच रुग्ण आहे, अशी माहिती ती डॉक्टर सतीश आदटराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी दिली.
 
Top