कळंब /प्रतिनिधी-
येथील स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडी च्या वतीने कळंब शहरातील पोलीस व पञकारांना रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे.कथले आघाडीचे सुमीत बलदोटा यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कळंब पोलीस ठाण्यातील 20 पोलीस व 25 पञकारांना या रेनकोटचे वाटप करण्यात आले.
 स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या माध्यमातून शहरात सतत नव नविन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.कथले आघाडी ही नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते.लॉगडाऊन काळात देखील आघाडीच्या वतीने पोलीस व गरजु लोकांना मदत केली होती.पाऊसाचा येणारा हंगाम लक्षात घेऊन पोलीस व पञकारांना पाऊसापासुन बचाव करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलायाचे आघाडीचे यश सुराणा यांनी सांगितले.या रेनकोटचे वाटप आघाडीचे बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा,गजानन फाटक,उद्यचंद्र खंडागळे, यश सुराणा,पञकार बालाजी निरफळ,ओंकार कुलकर्णी,शितलकुमार घोंगडे,अमर चोंदे,मनोज फल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.

 
Top