उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोना आपत्ती स्थितीमध्ये जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावणाºया परिवहन महामंडळाच्या चालकांचा अर्थात कोरोना योध्दांचा सन्मान करण्यात आला़ उस्मानाबाद येथे गुरूवारी (दि़४) पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला़
उस्मानाबाद येथे एसटी कामगार संघटनेच्या कार्यालयात संघटनेचे विभागीय सचिव शरद राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला़ अविष्कार फाऊंडेशन, श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी व एसटी कामगार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ कोरोना महामारीच्या आपत्कालीन स्थितीमध्ये जिवाची पर्वा न करता प्रवाशांना राज्यासह परराज्यात सोडण्यासाठी चालक म्हणून महत्वपूर्ण कर्तव्य बजावल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला़ यावेळी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश काशीद, उस्मानाबाद आगाराचे माजी अध्यक्ष राम माने, श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनीचे सचिव कुलदीप सावंत, स्थानक प्रमुख राम शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ संघटनेचे मार्गदर्शक मधुकर अनभुले यांनी प्रारंभी प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले़ यावेळी एसटी कामगार, वाहक व चालक उपस्थित होते़
या योध्दांचा सन्मान
परिवहन महामंडळाचे चालक अर्थात कोरोना योध्दा संभाजी सरवदे, बी़एल़देवकर, एस़डी़ पालकर, यु़बी़ जमादार, योगेश भोसले, बी़डी़ बोंदर, महादेव नरवडे, सुग्रीव गुरव, सतीश ढिगारे, अरुण राठोड, भारत तेरकर यांचा कोविड समाजरक्षक प्रमाणपत्र, शॉल व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला़

 
Top