उमरगा /प्रतिनिधी
 समाजात वाढत चाललेल्या  कोरोनाच्या संकटामुळे मानवी जनजीवन विस्कळीत होत आहे.मनाचे संतुलन बिघडत जात आहे.अश्या प्रसंगी अप्रबुद्ध मनापासून प्रबुद्ध मनांची उच्य उत्क्रांती घडविण्यासाठी अनापान सती ध्यान साधनेचा सराव करावा  असे प्रतिसाद धम्मचारी रत्नपालित यांनी व्यक्त केले.
त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने लॉक डाऊन च्या काळात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.बुधवारी दि तीन रोजी झूम अँपच्या मदतीने ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.दहा दिवस चालनाऱ्या  ध्यान वर्गाला लातूर उस्मानाबाद, बीड,सोलापूर आदी ठिकाणच्या ४५ व्यक्तींनी सहभाग नोंदविला होता.प्रारंभी धम्मचारी विरतकुमार यांनी पाली पूजा घेतली.या वेळी ध्यान सत्राच्या उद्घाटन प्रसंगी धम्मचारी रत्नपालित हे उस्मानाबाद येथून बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,माणसाचं मन हे सर्व धर्माचे उगमस्थान आहे कोणतीही कृती करण्याआधी ती मनात जन्म घेते आपण आपल्या मनाची अवस्था जाण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. नियमितपणे ध्यान केल्याने माणसांत आमूलाग्र बदल घडून येतो.आपण नेहमी भूतकाळ, किंवा भविष्य काळात वावरत असतो मात्र वर्तमान काळात आपण कसे आहोत हे पहात नाही स्वतः कसे आहोत आपली मानसिक अवस्था कशी आहे हे जाणून घेण्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
 धम्मचारी कल्याणदस्सी यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला तर धम्मचारी ज्ञानपालित यांनी  आभार मानले. ध्यान वर्गात ४५ व्यक्तींनी सहभाग घेतला होता.

 
Top