उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद विभागातील राज्य परिवहन महामंडळाकडून माल वाहतूक सुरु करण्यात आलेली असून दि.02.05.2020 रोजी उस्मानाबाद येथून हरभरा ची पहिली वाहतूक  सोलापूरसाठी करण्यात आलेली आहे.सदरील वाहतूकीचे उद्घाटन उस्मानाबाद विभागाचे विभाग नियंत्रक श्री राजीव साळवे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे.
सदरील उद्घाटन प्रसंगी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय वाहतूक अधिक्षक, आगार प्रमुख रा.प उस्मानाबाद है  उपस्थित होते. उस्मानाबाद विभागातील उस्मानाबाद, उमरगा, भूम,  तुळजापूर ,कळंब व परंडा या आगारातून माल वाहतूक करण्यात येणार आहे. सदरील माल वाहतूकीसाठी आगार प्रमुख, स्थानक प्रमुख तसेच विभागीय कार्यालय उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा. आपल्या मालवाहतूकीची रा.प महामंडळाकडून वाहतूक करण्यासाठी विभागातील सर्व व्यापारी बंधूनी संपर्क साधावा ,असे अवाहन विभागाचे विभाग नियंत्रक श्री राजीव साळवे यांनी केले आहे.
 
Top