परंडा/ प्रतिनिधी : -
सामाजिक सुधारणा आणि शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारे, सामाजिक समरसतेचे अग्रणी आणि रयतेचा पुत्रवत सांभाळ करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी भाजपा संपर्क कार्यालय,परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
   यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, शहराध्यक्ष अॅड. झहीर चौधरी, बिभीषण हांगे, महादेव बारस्कर, श्रीकांत सानप, गणेश भोगील आदी उपस्थित होते.

 
Top