उस्मानाबाद/ प्रतिनिधी
कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन आयुक्तांनी राज्यातील परिवहन कार्यालयातील विविध कामे सुरु करण्याचे निर्देश दिलेले आहेत. परिवहन कार्यालयातील नवीन अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती चाचणी, अनुज्ञप्ती दुय्यम प्रत करणे, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे, वायूवेग पथक योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण इत्यादी कामकाज सुरु करण्यात आलेली आहेत.
कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक अर्ज हा ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊनच स्विकारण्यात येत आहे. त्याकरिता उपलबध असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या संख्येनुसार ऑनलाईन प्रणालीत अपॉईटमेंट कोटा निश्चित करण्यात आला आहे. जेणे करुन कार्यालयात गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
तसेच कोवीड-19 पार्श्वभूमीवर सदर कामकाज पार पाडत असतांना कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना खालील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.
संपूर्ण कार्यालय नियमितपणे सॅनिटाईज करणे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी मास्क, ग्लोव्हज वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे. कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतासाठी कार्यालयाच्या मुख्य गेटवर सॅनिटाइजर पुरविण्यात आले असून प्रत्येकांचे थर्मल स्क्रिनिंग तपासूनच कार्यालयात प्रवेश देण्यात येत आहे.
दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर ठेवणे. एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक, की-बोर्ड सॅनिटाईज करणे. शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणीस येणाऱ्या अर्जदाराने मास्क व हँडग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश करणे. पक्की अनुज्ञप्ती चाचणीपूर्वी वाहन सॅनिटाईज करणे व एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज करुनच दुसऱ्या उमेदवाराची चाचणी घेणे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या वेळी वाहन सॅनिटाईज करणे इत्यादीसाठी जिल्ह्यातील सर्व वाहनचालक, मालक यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित सर्व कामे ही ऑनलाईन अपॉईटमेंट घेऊन कार्यालयात सादर करावीत व वरील सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.