उस्मानाबाद/ प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आलेला आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून व इतर राज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.
त्यामुळे संसर्गाचा धोका तर कमी होत आहे. परंतु त्याचबरोबर विलगीकरण कालावधीत देनंदिन दिनचर्येचे खालीलप्रमाणे नियोजनबध्द वेळापत्रक करणे आवश्यक
आहे. जेणे करुन गृह विलगीकरणातील व्यक्तीच्या प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होण्यास मदत होईल.
गृह विलगीकरण वेळापत्रक :
सकाळी 6.00 वाजता झोपेतून उठणे. 6.30 ते 7.00 अर्धा तास योगा प्राणायम. 7.00 वाजता 50 ते 100 मि.ली. गरम लिंबु पाणी पिणे.  7:30 ते 8:00 जिवनसत्व क युक्त नाष्टा करणे. 8:30 वाजता 50 ते 100 मि.ली. हळद घातलेले गरम दुध पिणे. 9:00 वाजता 5 ते 10 मिनिट वाफ घेणे. 9:30 वाजता 50 ते 100 मि.ली गरम पाण्यातील काढा पिणे. 11:00 वाजता 50 मि.ली. गरम चहा पिणे.
दुपारी 12:00 वाजता 50 ते 100 मि.ली. गरम लिंबु पाणी पिणे. 1:00 ते 2.00 वाजता जिवनसत्व ‘क+ब’ युक्त दुपारचे जेवण घेणे. 3:00 वाजता 5 ते 10 मिनिट वाफ घेणे.
सायं 4:00 ते 5:00 वाजता एक तास दुपारचा आराम. 5:30 वाजता 50 ते 100 मि.ली. गरम पाण्यातील काढा घेणे. 6:00 ते 7:00 वाजता एक तास योगा व व्यायाम. सायं 7:00 वाजता 50 ते 100 मि.ली. गरम लिंबु पाणी घेणे. 7:30 ते 8:30 वाजता जिवनसत्व ‘क+ई रात्रीचे जेवण. रात्री 9:00 वाजता 5 ते 10 मिनिट वाफ घेणे. 9:30 वाजता 50 ते 100 मि.ली. गरम पाण्यातील काढा घेणे. झोपेच्या अगोदर 50 ते 100 मि.ली. हळद घातलेले गरम दुध घेणे.
गृह विलगीरकणात असलेल्या व्यक्तींनी वरीलप्रमाणे आपली दिनचर्या तयार करुन अंमलात आणावी. जेणेकरुन कोव्हीड पासून आपण स्वत:ला सुरक्षित ठेऊ शकतो. तसेच आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपणच प्रयत्न केल्यामुळे आपल्या शरीराबरोबरच मानसिकतेमध्ये सुध्दा बदल निश्चितच होतो. गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींनी वरीलप्रमाणे दिनचर्येचा अवलंब करावा तसेच इतरही व्यक्तींनी चांगल्या आरोग्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top