
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेची मुख्यमुळ मुर्ती सुर्यग्रहण काळात शुभ्रवस्ञासह देविच्या मुख्य गाभाऱ्यात तील चांदीचा सिहासनात सोवळ्यात ठेवण्यात आली होती . मिती जेष्ट वध 30रविवार दि21रोजी असणाऱ्या कंकणाकृती सुर्यग्रहण पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेचे धार्मिक विधी पुर्वपरंपरे संपन्न झाले.
रविवार दि 21 रोजी पहाटे 4.30 वा श्रीतुळजाभवानी मंदीराचा मुख्य निंबाळकर दरवाजा उघडण्यात आल्या नंतर पहाटे 5.ते5.15वा चरणतिर्थ , करण्यात आले. नंतर सकाळी सहा वाजता पुजेची घाट करण्यात येवुन श्रीतुळजाभवानी देवीस दहीदुधपंचामृतअभिषेक पुजा करण्यात आल्या नंतर आरती व दुपारती करण्यात आली. नंतर 9.50वा पुजेची घाट करण्यात करण्यात आल्यानंतर पुजारी देविजवळ आल्यावर निर्माल्य विसर्जन करण्यात आले. नंतर,श्रीतुळजाभवानी मातेस 10.8 वाजल्या पासुन सोवळ्यात ठेवण्यात आले 01.37 वा नंतरग्रहण काळ संपल्यानंतर देवीस पंचामृत स्नान घालण्यात येवुन वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर आरती धुपारती करण्यात आली.सांयकाळीची नित्य पुजा नेहमी प्रमाणे संपन्न झाली .
सुर्यग्रहणानंतर महाध्दार मधुन नागरिकांनी देवीदर्शन !
कोरोना पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीरात भाविकांना प्रवेश बंद असल्याने धार्मिक वृत्ती चा भाविकांनी घरीच स्नान करुन राजमाता जिजाऊ महाध्दार समोर येवुन कळस दर्शन घेतले.व नंतर गोरगरीबांना यथा शक्ति दान करुन पुण्यपदरी घेण्याचा प्रयत्न केला