लोहारा/ प्रतिनिधी
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त व लोहारा तालुक्याचे युवासेनेचे तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत अनावश्यक खर्च टाळून कोरोणावर लस उपलब्ध नसल्याने प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी एकमेव प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन भारत सरकार आयुष्य मंत्रालयाने प्रतिबंधात्मक औषध म्हणून सुचवलेले अर्सेनिक अल्बम 30 गोळ्या चे लोहारा शहर प्रत्येक उंबरठा वाटप, लोहारा ग्रामीण रुग्णालय येथे अर्सेनिक गोळ्या फेसशील्ड व लोहारा पोलीस स्टेशन येथे अर्सेनिक गोळ्या फेसशील्ड व सॅनिटायजर वाटप, व लोहारा शहरातील सर्व व्यापारी वर्गास अर्सेनिक गोळ्या व सॅनीटायजर वाटप करण्यात आले. 
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा पाटील, नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षयजी ढोबळे, शिवसेना तालुका प्रमुख मोहन पनुरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेवमामा लोभे, जिल्हापरिषद सदस्य दिपकभैय्या जवळगे,  लोहारा युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, उमरगा युवासेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी, तुळजापूर चे युवासेना तालुका प्रमुख प्रतिक रोचकरी, युवासेनेचे उपतालुका प्रमुख शिवराज  चिनगुंडे, लोहारा नगरपंचायत चे गटनेते अभिमानजी खराडे, नगरसेवक शाम नारायणकर, नगरसेवक अतिक पठाण, पंचायत समितीचे माजी सदस्य सुधीर घोडके, शहर प्रमुख सलीम शेख, श्रीकांतजी भरारे, मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष भरत सुतार, दत्ताभाऊ मोरे, प्रदीप मडुळे टायगर ग्रुप नागूर यांच्यसह लोहारा उमरगा तालुक्यातील युवासैनिक, शिवसैनिक व सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी सांगीतले की, लोहारा शहरातील सर्व उंबरठ्यांना अर्सेनिक अल्बम - ३० गोळ्यांचे वाटप, लोहारा शहरातील सर्व व्यापाऱ्यांना सॅनिटायझर व अर्सेनिक अल्बम -३० गोळ्यांचे वाटप, लोहारा शहरातील शासकीय कार्यालयातील, बँकांतील , पोलिस व रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना फेल्ड शिल्ड व आर्सेनिक अल्बमचे - ३० गोळ्यांचे वाटप करण्यात  येणार आह, असे सांगीतले, याची सुरवात आज करण्यात आली आहे, असे सांगितले.
 
Top