उस्मानाबाद/ प्रतिनिधी : -
न्यायप्रविष्ठ लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली.
बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणारा दूरदृष्टी लोकराजा, सामाजिक क्रांतीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन समानतेसाठी राजर्षी शाहू महाराज यांनी सदैव कार्य केले.
त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, सहाय्यक प्रशासन अधिकारी ए.वी. सावंत यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 
Top