तुळजापूर / प्रतिनिधी-
 येत्या 30 जुनला लाँकडाऊन संपत असल्याने शाषणाने मंदीर भाविकांन साठी खुले करण्याचे आदेश दिले तर  पुर्वतयारी असावी यासाठी शुक्रवार दि. 26रोजी श्रीतुळजाभवानी मंदीर संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचा प्रशासकीय कार्यालयात होवुन यात सविस्तर चर्चा झाली.
या कारणासाठी या पुर्वी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान ने पहिली बैठक गुरुवार दि. 18रोजी घेतली होती शुक्रवार ची ही दुसरी बैठक संपन्न झाली. अँडिशनल जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस एस.डी.ओ रामेश्वर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ दिलीप टिपरसे , तहसिलदार योगिता कोल्हे,  धार्मिक व्यवस्थापक सिध्दैश्वर इंतुले उपस्थितीत होते .
या बैठकीत गर्दी वर नियंत्रण आणण्यासाठी काय करावे लागैल या बाबतीत सविस्तर चर्चा झाली  सोशल डिस्टंन्स पाळुन भाविकांना दर्शन देण्यासाठी काय करावे लागणार यावर ही सखोल चर्चा झाली
 महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेचे मंदीर भाविकांना खुले करण्या पुर्वी  काय पुर्व तयारी करावी या संबंधी  पुर्व तयारी करण्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली. शासनाने मंदीर खुले करण्यास परवानगी दिल्या वर भाविकांना कसे दर्शन द्यायाचे या बाबतीत काय करावे लागेल यात सविस्तर चर्चा झाली . यात कोरोना पासुन भाविक , पुजारी,  व्यापारी, शहरवासिय यांच्या सुरक्षे बाबतीत काय दक्षता घ्यावी  .तसेच गर्दी टाळणे यासाठी काय करावे या बाबतीत प्रामुख्याने चर्चा झाली
 
Top