उस्मानाबद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरालगत असणाऱ्या घाटंग्री शिवारातील जंगलात (फॉरेस्ट) शेकडो लहान मोठे प्राणी संचार करतात.सध्या मे च्या महिन्यात उन्हाची तीव्रता जबरदस्त वाढली आहे त्यामुळे मुक्या जीवाची काहीली होत आहे.गेल्या काही महिन्यांपासून जंगलात राहणारे वन्य प्राणी हरीण,लांडगे,कोल्हे,मोर, ससे,विविध प्रकारचे सर्प व सरपटणारे प्राणी यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे फॉरेस्ट खात्याने जंगलात पाणवठे तयार केले आहेत तेंव्हा प्रशासनाच्या सहकार्याने  मनसे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या माध्यमातून पाणवठ्यात टँकर च्या द्वारे पाणी सोडून पूर्ण पाणवठे भरून घेतले व पुढील काही दिवसांची या मुक्या प्राण्यांची तहान भागवली.
यावेळी मनसे शिक्षक सेनेचे नेते बबनराव वाघमारे सर, विद्यार्थी सेनेचे तन्मय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते काका पेठे, वन विभागाचे कर्मचारी आर. एस.माळी इत्यादी उपस्थित होते. 
 
Top