उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे मध्यम कर्ज आणि दोन लाखाहून अधिक पीक कर्ज घेणारे शेतकरी खूपच कमी आहेत. मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्र राज्यातील दि 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील शेतीधारक शेतकऱ्यांनचे 2 लाख रु कर्ज माफीचा लाभ देण्यात आलेला आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनकडे फळबाग, फुलशेती, द्राक्षे व आंबे आदी पिके घेणारी शेतकरी आहे. त्यांचे मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज माफ केले जात नाही.
राज्यात अलिकडील काळात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी त्रासलेले आहे. राज्यात कोरोना व्हायरसच्या संकटाच्या परिणामाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला काहीच किंमत मिळत नसल्याने त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत त्या शेतकर्‍यांना कर्ज परतफेड करणे अशक्य झाले आहे.
ज्याप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी योजनेचा लाभ केंद्र सरकारने 2007 मध्ये शेतकऱ्यांना दिला होता. त्याचप्रमाणे यावर्षीही संपूर्ण कर्जमाफी योजना राबविणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज माफ करावे. उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांची ईमेल व्दारे देशाचे पंतप्रधान  नरेंद्र   मोदी  व केंद्रीय कृषीमंत्री  नरेंद्रसिंह तोमर  यांच्या कडे करण्यात आली.
 
Top