कळंब / प्रतिनिधी -
कोरोना माहामारी रोखण्यासाठी डॉक्टर्स मंडळी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालय हे कोव्हीड हॉस्पिटल म्हणून परावर्तित केले आहे. यामध्ये १० (दहा) खाटांचे आय सी यु सेंटर तयार केले असून त्याला लागणारे विशिष्ट पद्धतीचे बेड्स, सेंट्रल आॅक्शिजन, प्रशिक्षित कर्मचारी ई तैनात करण्यात आले आहेत. सेंटरमध्ये  व्हेंटिलेटर ( कृत्रिम श्वसन प्रणाली)  ची कमतरता होती आणि ती मागणी शासनाकडे प्रलंबित आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राज गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैधकीय अधिक्षक डॉ जिवन वायदंडे यांचे आवाहनास प्रतिसाद देऊन येथील बालरोगतज्ज्ञ डॉ रामकृष्ण लोंढे यांनी त्यांच्या हॉस्पिटल ( विजया नर्सिंग होम) मधिल व्हेंटिलेटर हे नुकतेच कोव्हीड हॉस्पिटल मधिल आय सी यु सेंटर मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. डॉ अभिजीत लोंढे यांचे तज्ञ मार्गदर्शन येथिल स्टाफला मिळणार असुन त्यांना डॉ प्रशांत जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. नुकतेच माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते व माननीय आमदार कैलास पाटील यांचे अध्यक्षतेखाली,वैद्यकीय अधिक्षक डॉ जिवन वायदंडे, शिवाजी अप्पा कापसे, प्रदीप मेटे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत याचे उदघाटन झाले असून रुग्ण सेवेसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
लवकरच कोरोना माहामारी चा प्रभाव कमी होवुन साथ आटोक्यात येणार आहे. त्यासाठी जनतेने शासनाच्या सुचनांचे पालन करावे. लॉकडाऊन चे  नियम पाळले जावेत. मास्क लावणे. वारंवार सॅनटायजर / साबुण पाण्याने हात धुने व एकमेकां पासुन दोन हात दुर राहणे. या त्रीसुत्रिचा अवलंब केल्यास आपण कोरोनावर सहज यश संपादन करु शकतो. या वर्षी धंदा-पाणी, नफा-तोटा, सण उत्सव, मौजमजा वगैरे गोष्टींचा विचार न करता आपण सुरक्षित कसे राहू याचा विचार केला पाहिजे व तो अमलात आणला पाहिजे. असे आवाहन आय एम ए चे नियोजित प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे यांनी केले.
 
Top