आरोग्य सेतु ऑप प्रत्येक नागरिकांनी डाऊनलोड करण्याचे आवाहन
 गोविंद पाटील /प्रतिनिधी-
आज विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रात अनेक असंभव शस्त्रक्रिया करने सुलभ झाल्याचे आपल्यास पहावयास, ऐकण्यास मिळत आहे. आज मुल नसणाऱ्या जोडप्यांना टेस्ट टुब बेंबी सारख्या उपचारानंतर संतान प्राप्तीचा आनंद मिळत आहे. उस्मानाबाद शहरातील प्रसिध्द डॉक्टर राजगुरू यांनी अनेक आपत्य हीन जोडप्यांना टेस्ट टयूब बेंबी च्या माध्यमातून संतान प्राप्तीचे सूख दिले आहे देत आहेत. त्यामुळे आपत्य हीन जोडप्यांचे जीवन सूखी झाले असल्याचे अनेक उदाहरण, प्रसंग आपण अनुभवले आहेत. परंतुु आज विज्ञाना ने वैद्यकीय क्षेत्राने मोठी झेप घेतली असली तरी, एचआयव्ही,  कोरोना आदी आजारासंदर्भात ठोस उपचार अथवा कोणती ही लस  , ऑपरेशन जेनेकरून हा रोग कायमचा नष्ट होईल या दृष्टीकोनातुन  वैद्यकीय क्षेत्रात नव-नवीन उपचार, औषधे, लस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच अशा रोगांना मुळासगट संपविण्यासाठी  वैद्यकीय क्षेत्र यशस्वी होईल. परंतु नागरिकांनी या रोगांपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनाचे पालन करने अनिवार्य आहे. सध्य परिस्थितीत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छते चे काटेकोर पालन करने, मास्कचा उपयोग करने ही प्रत्येकांची जिम्मेदारी आहे.
तालुक्यातील बेंबळी गावामध्ये बेंबळी विकास चर्चा या फेसबुक पेजवर अॅड. उपेंद्र कटकेयांनी केलेल्या यशस्वीपुर्ण मार्गदर्शनानंतर याच पेजवर रविवार २४ मे च्या रात्री ठिक ८ वाजता   प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमोल सूर्यवंशी, डॉ. रोहीत राठोड यांनी गावातील नागरिकांना कोरोना आजाराबाबत संपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी गावातील नागरिकांनी वैद्यकीय स्तरावरील विचारलेल्या सर्व प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देऊन नागरिकांच्या मनातील भिती दुर करण्याचा प्रयत्न केला. पुढे ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असताना डॉ. सूर्यवंशी, डॉ. राठोड म्हणाले की, कोरोना आजाराबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे, जेणे करून नागरिकांच्या मनातील शंकाचे निरसन होण्यास मदत मिळेल. कोरोना वायरस हा आपल्या देशात होता. त्यानंतर नवीन कोरोना वायरचा प्रकार २०१९ डिसंबर मध्ये आलेला आहे, त्यामुळे त्याला कोवींड १९ असे नाव दिलेले आहे.   सर्दी, खोकला, शश्वनाचा त्रास हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे. हा वायसर प्रामुख्याने तीन प्रकारेआपल्या शरीरात प्रवेश करू शकतो,त्यामध्ये नाक, तोड व पॉझीटीव्ह व्यक्तीच्या संपर्कातुन व  जखमेतुन सुध्दा तो आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. प्राथमिक केंद्रात सर्वप्रथम पॉझीटीव्ह व निगेटीव्ह रूग्ण याच्यामधील सिस्टम तपासले जातात. ताप, हायग्रेड फिवीर (खूप प्रमाणात ताप असणे), घसा करोडा पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे हे कोवींड १९ मधील मुख्य सिस्टीम आहे. यामध्ये रूग्णांची सीआरडी तपासणी करण्यात येते. यामध्ये जर सिस्टम जर नॉर्मल असतील तर त्याची तपासणी करण्याची आवश्यकता नाही, यावेळी या रूग्णांना त्या आजारा संदर्भात गोळ्या देऊन अलग राहणे, थंड पदार्थ खाने टाळण्याचा सल्ला दिला जातो. या रूग्णांचे सात व ८ दिनानंतर ही  सिस्टम जर वाढत गेल्यानंतर घशामधुन किंवा नाकामधुन स्वॉब घेण्यात येतो. याची सोय उस्मानाबाद शहरात करण्यात आलेली आहे. यामध्ये जर रूग्णांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला असेल तर तो रूग्ण कोरोनाबाधीत रूग्ण म्हणून ओळखला जातो.
नागरिकांनी किरकोळ सर्दी, ताप, खोकला असेल  घाबरून जाण्याची गरज नाही. परंतू एकादा नागरिक कोरोना पॉझीटीव्ह व्यक्तीच्या  संपर्कात आलेला असेल तर तो ही व्यक्ती कोरोना बांधीतहोण्याचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी घरीअसल्यानंतर आपल्या आरोग्याची काळजी घेताना प्रत्येकांनी २० सेंकद हाथ स्वच्छ साफ करने, विनाकारण कोणत्याही वस्तूला हाथ न लावणे, आपल्या हाथाचा स्पर्श वारंवार आपल्या नाकाला, तोंडाला करायचा नाही, रोग प्रतिकार शक्ती वाढण्याची गरज आहे. ही रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लिंबु, मोसबी,संत्री, आवळा अशा पदार्थाचे सेवन करने गरजेचे आहे, वेळेवर जेवण करणे गरजे आहे, व्यायाम करने गरजचे आहे. कोरोना आजार हा श्वसन प्रकिया से निगडीत असल्याने थंड पेय टाळण्याची गरज आहे. थंड पेय हे या आजारासाठी पोषक आहे, त्यामुळे कोमट पाणी पिणे गरजेचे आहे.  यापुर्वी ही  ‘एसएआरसी’ (सार्स) व ‘एमईआरएस’ या दोन जीवघेण्या कोरोना विषाणूंची साथ यापूर्वी आपण अनुभवली. आता आलेला ‘सार्स-सीओव्ही-२’ हा त्याच जातकुळीतील तिसरा विषाणू आहे.
या कोरोना आजारा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास योग्य ती मदद करने गरजेचे आहे. नागरिकांनी परराज्यातुन अथवा पुणे-मुंबई आदी शहरातुन आल्यानंतर स्वताहुन आपली माहिती स्वास्थ्य विभागास देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येते. शासनाने  अशा लोकांना स्कुल क्वारंटाईनचे सक्त आदेश दिले आहेत. गभर्वती महिला, ५५ ते ६० च्या दरम्यान असलेले नागरिक, स्तनदा माता, बीपी च्या लोकांना होम क्वारंटई करण्यात येते. क्वारंटईन केल्यानंतर कोणी बाहेर फिरायचे  नाही ,त्यांनी दिलेल्या सूचनाचे पालन करावे. अगर कोणी क्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरत असेल संबंधित जबाबदारी व्यक्ती ने पुढाकर घेऊन पोलिसांना कल्पना द्यावी. बेंबळी गावात ७१ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ३० लोकांना होम क्वारंटईन करण्यात आले तर कांही लोकांना शेतात क्वारंटाईन करण्यात आले आहे.१४  दिवसांचा क्वारंटाईन कार्यकाल संपल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देता येते. हे प्रमाणपत्र कोरोना सहाय्यता कक्षाने अथवा प्राथमिक आरोग्य विभागामार्फत देता येते. कोरोना वायरस कोणत्याही मौसमामध्ये होऊ शकतो, पण पावसाळा हा या रोगासाठी पोषक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांनी आरोग्य सेतु ऑप डाऊनलोड करावे. त्याद्वारे आपण योग्य व अचूक माहिती मिळते.  मार्केट मधुन भाजी, फळे घरी आल्यानंतर सर्वप्रथम ते स्वच्छ साफ करने अथवा  गरम पाण्यात उकडून घेण्याची गरज आहे. सॅनिटाझरचा वापर फक्त हाथ साफ करण्यासाठी करावा इतर अन्य गोष्टीसाठी करू नये  आदीं संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन करून घरी रहा सुरक्षीत रहा असा संदेश देऊन ईदनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाचेआयोजक रणजीत बरडे, अॅड. उपेंद्र कटके, रोहित निकम यांचे त्यांनी आभार मानले.
अॅड. अमर कटके याच्या प्रमाणेच डॉ. सूर्यवंशी व डा. राठोड यांचा ही फेसबुक लाईव्ह संवादाचा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. तसेच या दोन्ही डॉक्टर जोडी चेे बेंबळी ग्रामस्थांमधुन व जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे. आत्तापर्यंत त्यांच्या लाईव्ह संवाद चर्चा व्हिडीओस  १५३ लोकांनी लाईक केले तर ११९ लोकांनी कमेटद्वारा आपले प्रश्न विचारले. तर शेकडो लोकांनी  हा व्हिडीओ बघितला आहे.  
 
Top