लोहारा/प्रतिनिधी
 नांदेड जिल्हयातील नागाठाणा येथील मठाधीपती निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज याची हत्या करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून फाशी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील (लोहारा) यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, दि  २४ मे २०२० राेजी  नांदेड जिल्ह्यात नागाठाणा  येथील मठाधिपती निर्वाण रुद्र पशुपति शिवाजी शिवाचार्य महाराज यांची हत्या झाली. यामुळे पूर्ण राज्याला धक्का बसला. निर्वाण रुद्र पशुपति महाराजांनी आपल्या सेवा कार्याच्या माध्यमातून पूर्ण गावाचा कायापालट केला. अन्नक्षेत्र सेवाही  चालवित हाेते . यापुर्वी महिनाभरात पालघर येथील दाेन साधु संताची पाेलिसांच्या समक्ष हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे महाराष्ट्रात साधू सध्या सुरक्षित आहेत का नाही अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.तरी दाेन्ही हत्याप्रकरणात स्वत: मुख्यमंत्री यांनी गांभीर्याने लक्ष घालुन दोषींना कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटिल, भाजपा माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेटटी, तालुका  सरचिटणीस नेताजी शिंदे, भाजयुमाेर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष प्रमाेद पाेतदार, आेबिसी माेर्चा तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, उपस्थित हाेते. 
 
Top