उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री शंकरराव गडाख हे अखेर उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर उद्या मंगळवार दि. २६ मे २०२० येत आहेत. परंतु ते एका तासातच बैठका गुंडळणार असल्याचे त्याच्या दौऱ्यातील वेळापत्रकात दिसून येत आहे.
पालकमंत्री  मंगळवार २६ मे २०२० रोजी सकाळी ०७:०० वाः  सोनई ता. नेवासा जि. अहमदनगर येथून उस्मानाबाद कडे प्रयाण  (वाहन क्र.MH १६, ०९०९) (मार्ग: सोनई - पाथर्डी - मादळमोही- मांजरसुंभा - उस्मानाबाद), त्यानंतर सकाळी १०:३० वाः जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे COVID -१९ आढावा बैठकीस उपस्थिती. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प., पोलीस अधीक्षक, अधिष्ठाता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन  यानंतर ११:००  वाजता खरिप हंगाम पुर्व आढावा बैठक. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प., पोलीस अधीक्षक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी, अधिक्षक अभियंता, महावितरण, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी, एम.डी. जिल्हा मध्यवती बँक व सकाळी ११.३० वाजता  पाणीटंचाई आढावा बैठक पाणी टंचाई संदर्भात जिल्हा स्तरीय ५ ते ६ अधिकारी उपस्थिती राहिल यानंतर सोईनुसार सोनई ता. नेवासा. जि. अहमदनगर कड़े प्रयाण करतील. त्यांच्या सोबत  श्री. संजय टेमक. मो. ९८८१९९८१११ असतील. अशी माहिती  त्यांचे खजगी सचिव बप्पासाहेब थोरात यांनी दिली.
जिल्हयात करोना रूग्ण वाढत असतानाच पालकमंत्री एका तासातच बैठका गुंढाळणार असल्यामुळे अश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 
Top