तुळजापूर / प्रतिनिधी- 
लाँकडाऊन दोन महिने होताच लगेचच पुण्याहुन आलेला कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण सापडल्याने तुळजापूर शहरासह परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले,  त्याचा परिणाम शहरातील अर्थिक व्यवहार दिसुन आला, माञ संशियत २३ अहवाल निगेटीव्ह येताच घबराहटीचे वातावरण दूर होवुन शहरातील सर्व व्यवहार पुर्णपणे सुरुळीत झाल्याने शहर पुनश्च पुर्वपदावर  आल्याचे चित्र दिसुन येत आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूरात मार्च एण्ड ते जुन अखेर पर्यत भाविकांची मोठी गर्दी असल्याने एप्रील ते मे हे दोन महिने तिर्थक्षेञ तुळजापूर अखंडीत २४ तास उघडे राहत, माञ एप्रील पुर्वीच लाँकडाऊन सुरु झाले ते  मे अखेर पर्यत चालुच राहणार असल्याने गेली दोन महिने भाविकांनी भरभरून वाहणारे तिर्थक्षेञ तुळजापूर ओस पडले त्यामुळे स्थानिक नागरिक, पुजारी, व्यापारी सह अन्य याञा संबंधित व्यवसायिकांचे लाखो रुपये नुकसान झाले त्यात लाँकडाऊन संपताच व्यवहार सुरु होतील वाटत असतानाच अचानक पुण्याहुन आलेला रुग्ण तुळजापूरात सापडतच पुनश्च शहर बंद झाले. त्यानंतर शहरवासियांन मध्ये  पुनश्च चिंतेचे वातावरण पसरले माञ सुदैवाने कोरोना बाधित रुग्णांचा संपर्कामधील २३ लोकांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने तुळजापूरकरांनी सुटकेचा श्वास सोडला .नंतर माञ गेली दोन दिवसापासुन शहरातील सर्वच व्यवहार सुरुळीत सुरु होवुन जनजीवन सुरुळीत झाले आहे.
तुळजापूरकर श्रीतुळजाभवानी मंदीर केंव्हा भाविकांनसाठी खुले होईल याची आतुरतेने वाट पहात आहेत. सध्या नागरिकां मध्ये सोशल डिस्टंन्स ठेवुन तोंडाला मास्क रुमाल बांधुन बाजारात येवुन जीवनाश्यक वस्तु खरेदीसाठी गर्दीकरीत आहेत.   श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानने पोलिस खात्याला दिलेला खाजगी सुरक्षा रक्षक बाजार पेठेत फिरुन गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना सुचना देत आहेत. शहरातील भवानी रोड, बस स्टँड परिसर, क्रांती चौक,  शिवाजी चौक,  मंगळवार पेठ,  उस्मानाबाद रोड वर नागरिकांंची वर्दळ खरेदी साठी दिसुन येत आहे.   उर्वरीत मंदीर परिसर, शुक्रवार पेठ सह अन्य भागातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहेत. किराणा , मोबाईल, मिठाई , कपडे, भाड्याच्या दुकानांमध्ये गर्दी दिसुन येत आहे. खास करुन लग्नासाठी कापड व भांडी दुकांन मध्ये गर्दी दिसुन येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी हळुहळु भाजीपाला विक्रीस घेवुन येत असल्याने कमी किंमतीत ताजा भाजीपाला मिळत असल्याने  नागरिक तर भाजीपाला विकल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. नळदुर्ग रोड कमानवेस भागातील बँका समोर लांबच्या लांब रांगा लागल्याचे चिञ अजुनही दिसुन येत आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यत बाजार पेठेत गर्दी दिसुन येत असुन त्यानंतर माञ  शहर बंद होत आहे. कोरोना संकटा नंतर हळु हळु शहर पुर्वपदावर येण्यास आरंभ झाला आहे.आता लोकांना दुकाने उघडे राहणार याची खाञी होत असल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे.
 
Top