उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक 25 मे  रोजी लातूर येथील प्रयोगशाळेत  पाठवलेल्या अहवाला मधील प्रलंबित असलेल्या पाच अहवालांमधून तीन व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोन व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
जिल्हयात एकुण ३८ कोरोना बाधीत रूग्णांची नोंद झाली असून ९ रूग्णांना उपचारानंतर घरी पाठविले आहे. तर जिल्हयात सध्या २९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
      पॉझिटिव्ह आलेल्या तीन व्यक्ती पैकी एक उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर चा रुग्ण असून तो मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. दुसरा तेर येथील रुग्ण असून तो पुणे येथून प्रवास करून आलेला आहे. तर तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा कळंब  तालुक्यातील शिराढोण येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे, असे डॉक्टर सतीश आदटराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी कळविले आहे.
उस्मानाबाद जिल्हयात २६ मे रोजी कोरोना बाधीत रूग्ण ३८ असून त्यापैकी ९ उपचार करून घरी पाठविले आहे. जिल्हयात सध्या २९ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे जिल्हयात सापडलेले सर्व कोरोना बाधित रूग्ण हे मुंबई-पुणे-सोलापूर येथुन आले आहेत. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय प्रमाणपत्र देताना नेमके कशा प्रकार तपासले याची चर्चा होत आहे. 
 
Top