उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी येथील वीज कर्मचाऱ्यांना त्यांची गरज ओळखून कोरोणा दक्षता समितीच्या वतीने गावातील वीज कर्मचाऱ्यांना बॅटरीचे वितरण करण्यात आले.
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे कोरुना दक्षता समितीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. दानशूर यांच्या मदतीने सुमारे चारशे नागरिकांना किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच गावातील नागरिकांना तीन टन द्राक्षांचेही वितरण झाले. गावातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेनीटायझर व मास्क चे ही वितरण समितीच्यावतीने करण्यात आले. संचार बंदीच्या काळामध्ये वीस गेल्यानंतरवीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना प्रकाशाची व्यवस्था नव्हती. चार दिवसांपूर्वी वीज गेल्यानंतर गावातील पोलिस ठाण्याच्या जवळ वीज वाहिनी व्यवस्थित करत असताना वीज कर्मचाऱ्यांजवळ बॅटरी नसल्यामुळे त्यांना गैरसोय सहन करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन समितीच्या वतीने गावातील वीज कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनात बॅटरी वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला.
आदींच्या हस्ते झाले बॅटरीचे वितरण 
 यावेळी सचिन मोटे, रफातुल्ला सय्यद, सय्यद लालूमिया, बापू माने यांना  गालिबखान पठाण, सुनील वेदपाठक श्याम पाटील,  रणजीत बर्डे, नितीन खापरे पाटील, अॅड. अमर कटके गोविंद पाटील, बालाजी माने, शितलभैया शिंदे, आतिक सय्यद, नंदकुमार मनाळे, सिद्धनाथ रेडेकर आदीं सदस्यांच्या हस्ते बॅटरीचे वितरण करण्यात आले.
 
Top