डॉ.ताडेकर यांच्या द्वरे सुरू दुहेरी समाजसेवा, सोशल मीडियावर झाला कौतुकाचा वर्षाव 
गोविंद पाटील/ प्रतिनिधी-
राज्य व केंद्र सरकार ने कोरोना या आजारापासून सर्वांचे संरक्षण व्हावे, या उद्देशातुन लॉकडाऊन, संचार बंदी, जमाव बंदी, तसेच विविध उपाययोजना राबवून देशातील  नागरिकांनाी घरात रहावे तसेच   स्वच्छतेचे पालन करावे, या संदर्भात  आवाहन करून त्या दृष्टीकोनातून वेळोवेळी कडक निर्णय ही घेतले.  या लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये मेडीकल व अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व कांही बंद होते. परंतु त्या नंतर ही कांही महाभाग पानटपरी चालक पान, मटेरील, सुपारीचे व्यसन असणाऱ्या नागरिकांना घरपोच सेवा देण्याचे काम करीत  असल्याचे दिसुन आले. त्यामुळे लोकांना कोरोना आजाराची लागण झाल्याचे  आनेक प्रकरणे वेळोवेळी समोर आली. परंतु अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करत हे पानटपरी चालक पैसे कमविण्याच्या नादात लोकांच्या जीवनाशी खेळ करीत असल्याचे दिसून आले. आशा महाभाग पानटपरी चालकांचा मी उपासात्मक सत्कार करणार आहे. त्यासाठी मी वेगळे  आर्थिक बजेट तयार केले आहे, अशा प्रकारची खोचक प्रतिक्रीया बेंबळी येथील डॉक्टर सचिन ताडेकर यांनी दिली.
डॉ. ताडेकर पुढे म्हणाले की, उस्मानाबाद तालुक्यासह अनेक गांवामध्ये हे पानटपरी चालक शटरच्या आत राहून  तर कांही घरातून  पान मटेरील, सुपारी, गायछाप, सिगारेट आदींची व्यवस्था करून लोकांच्या घरपोच सेवा देत असल्याचे अनेक प्रसंग मी जवळून अनुभवले आहे. अशा पान टनटपरी चालकांवर पोलिसांकडून अद्याप कसल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे त्यांचे आणखी बळ वाढल्याचे दिसून आले. या सर्व पानटपरी चालकांनी जी सेवा केली आहे, त्याबद्दल मी त्यांचा यथोचित सत्कार करणार आहे. त्यासाठी मी विशेष आर्थिक बजेटची तयारी केली आहे. ज्या पानटपरी चालकांनी लॉकडाऊन चे नियम तोडून घरपोच सेवा दिली आहे, लोकांच्या जीवनाशी खिळवाड करण्याचा प्रयत्न केला अशांनी  माझ्याशी संपर्क साधून आपल्या नावाची नोंदणी करावी, अशाचा मी जंगी सत्कार करणार असल्याचे डॉ. ताडेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सुरू आहे दुहेरी समाजसेवा 
बेंबळी येथील रहिवाशी डॉ. ताडेकर यांनी एकला चलो या भूमिकेतुन वैद्यकीय सेवे सोबत समाजसेवा करीत दुहेरी उपक्रम लॉकडाऊनच्या काळात राबवुन गरजवंताच्या मनामध्ये घर निर्माण केले. डाॅ. ताडेकर यांच्या वतीने दररोज एका कुटुंबाला किराणा साहित्याची मदत देण्यात येत आहे. या कामी ते कोणाचीही मदत घेत नाहीत. रोज रूग्णसेवा करताना मिळणाऱ्या मिळकतीतून हा उपक्रम ते राबवत आहेत. आतापर्यंत कोणतीच मदत प्राप्त न झालेल्या कुटुंबाची यादी तयार करून त्यांना शोधून डॉ ताडेकर मदत करत आहेत. लॉकडाऊन व त्यांनतरचा कालावधी संपेपर्यंत मी हा उपक्रम असाच चालू ठेवणार असल्याचे ही त्यंानी सांगितले. यासाठी मी पुर्ण नियोजन केले आहे. विशेष बाब ही आहे की, त्यांनी कोरोनाचे दाहक वातावरण असताना त्यांनी रूग्णसेवा २४ तास सुरू ठेवून वेळात-वेळ काढत योग्य तरी खबरदारी घेऊन गरजवंताना मदत केली.त्यांच्या या उपक्रमाचे सोशल मीडियामध्ये ही खूप कौतुक झाले तसेच बेंबळी गांवात त्यांचे व त्याच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

 
Top