उस्मानाबाद/प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील ज्ञानेश्वर कारभारी या युवा शेतकऱ्याने हाताशी आलेली पावणेतीन एकरातील केळी लॉकडाऊनमुळे बाजार ठप्प असल्याने गावातील लोकांना मोफत वाटप सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसापासून स्वता भाड्याने जीप करून प्रत्येकांच्या घरापर्यंत केळी पोंच करत करत असून या युवा शेतकऱ्याच्या दांशुर कृतीचे कौतुक होत आहे.
आस्मानी संकट असो किंवा सुलतानी संकट असो नुकसान सहन करण्याची शक्ती फक्त शेतकऱ्यातच असून तितकीच दांशुर वृत्तीही शेतकऱ्यातच पाहायला मिळते. सध्या कोरोना विषाणू संसर्गाने जग हैराण झाले आहे. यावर प्रभावी उपाय सोशल डिस्टन्सचा असल्याने सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता आपल्या देशात शहरासह ग्रामीण भाग ठप्प झाले असून गावासह जिल्हा, परजिल्हा व राज्य्याच्या सीमा बंद झाल्याने वाहतूक व्यवस्थेसह बाजारपेठा बंद आहेत. यात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे. जेवळी येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर मल्लिनाथ कारभारी यांची गावच्या पूर्वेकडे ३५ एकर शेती आहे. ते आपल्या वडिलांबरोबर लहानपणापासून शेती करतात नेहमी शेतीत वेगळेपणाचा प्रयोग असतो. त्यांच्या शेतातून गेलेल्या नदीत सकाळ रिलीफ फंडातून दोन वर्षांपूर्वी जलसंधारणाचे कामा झाले आहे. यंदा चांगल्या पावसामुळे येथे पाणी थांबले असून ज्ञानेश्वर यांचा कुपनलिका व विहिरीला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे त्यांनी आपल्या शेतात यावर्षी पाच एकर केळी, तीन एकच पेरू, दोन एकर मिरची, साडेचार एकर ऊस आदींची लागवड केली आहे. कष्ट व नियोजनामुळे त्यांची शेती बहरली आहे. आता पाच एकर पैकी पावणेतीन एकरातील केळी परिपक्व झालेले आहे. परंतु या लॉकडाऊने सर्वांना घरी बसविले आहे. त्यात शेतकरी तरी कसे सुटणार. केळी बाजारात पाठवता येत नसल्याने मोठे नुकसान होत आहे. या पेक्षा आपण पिकविलेेेले सर्वांंच्या तोंडी पडेल व पुण्याचा काम घडेल या दृष्टिकोनातून या शेतकऱ्यांनी लाखो रुपयचा नुकसान सोसून गेल्या आठ दिवसापासून स्वतः भाड्याने एक जीप करून बागेतील केळी काढून गावातील सर्व जाती धर्मातील प्रत्येकाच्या घरी केळी पोंच करीत आहेत. स्वतः आर्थिक  अडचण असून सुद्धा त्यांच्या या दानशूर कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top