उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी येथील रहिवाशी तथा अंगणवाडी सेविका विमल लक्ष्मण व्हनसनाळे (५५ ) यांचे अल्पशा अजारामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि.४ रोजी गांवातीलच स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंगणवाडी सेविका म्हणून  विमल लक्ष्मण व्हन्सनाळे यांनी गावाच्या विकासासाठी मोठे याेगदान दिले आहे. त्यांनी अथक परिश्रम घेऊन सरकारच्या विविध योजनांची माहिती पालक वर्गांना व गावातील नागरिकांना देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. त्या बेंबळी येथील दै. पुण्यनगरी पत्रकार सचिन व्हनसनाळे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले 2 सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सचिव संतोष जाधव व नातेवाईक,मित्र परिवार, गांवातील नागरिक, पत्रकार, डॉक्टर उपस्थित होते.
 
Top